
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचे सचिव, प्रतिथयश वास्तुआचार्य राष्ट्रीय पातळीवरील 12 पुरस्कार प्राप्त डॉ. दिनेश नागवेकर यांना इंडियन असोसिएशन ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला. याबद्दल आज आरपीडी हायस्कूलमध्ये सावंतवाडी तालुका भंडारी समाजाच्यावतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रसाद अरविंदेकर, गुरूनाथ पेडणेकर, समता सुर्याजी, शीतल नाईक, वैशाली पटेकर, किशोर चिटणीस आदी समाज बांधव उपस्थित होते.