सावंतवाडीतील प्राथ. आरोग्य केंद्रांना जनरल मेडीसिनचे वाटप

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुपेश राऊळ यांचा पुढाकार
Edited by: विनायक गावस
Published on: July 27, 2023 19:25 PM
views 104  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक असणार्‍या जनरल मेडीसिनचे वाटप तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आज बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला या औषधांचे वाटप करण्यात आले.

उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून प्राथमिक आरोग्य केंद्र असलेला औषधांचा तुटवडा पाहता या प्राथमिक आरोग्य केंद्रांना ही औषधे उपलब्ध करून उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असलेले कार्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्वसामान्य जनतेला ही जनरल मेडिसिन उपलब्ध करून जनसेवा करण्याचा उद्देश असून या आरोग्य केंद्रात अन्य कोणत्याही वस्तूची आवश्यकता असल्यास त्याची पूर्तता करू अशी ग्वाही तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली.

यावेळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मयुरेश पटवर्धन यांच्याकडे ही औषधे सुपूर्द करण्यात आली तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी ही औषधे उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉक्टर पटवर्धन यांनी त्यांचे आभार मानले यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार,आबा सावंत, बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शहर प्रमुख साईप्रसाद काणेकर, विभाग प्रमुख ओंकार नाडकर्णी,भाऊ वाळके अशोक परब, बांदा ग्रामपंचायत सदस्य सौ. देवल येडवे,सौ.रिया येडवे, ज्ञानेश्वर येडवे, रियाज खान, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, बाळू गावडे, मंथन गवस,महेश, शिरोडकर महिला आघाडी भारती कासार, रश्मी माळवदे, सुनील गावडे, प्रशांत बुगडे आदी उपस्थित होते.