
सिंधुदुर्ग : आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी या भवनासाठी मेहनत घेणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. बाळशास्त्रींची मुर्ती साकारणारे सुप्रसिद्ध मुर्तीकार विलास मांजरेकर, ओंकार मांजरेकर यांचा सन्मान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच संपूर्ण भवनाच्या इलेट्रिकल कामासाठी पिडब्ल्यूडी इंजिनियर राहुल कांबळी, कॉन्टॅक्टर ओमगणेश इलेक्ट्रिकलचे प्रसाद नार्वेकर यांनी मेहनत घेतली. याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते प्रसाद नार्वेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, प्रजित नायर, राजन तेली, उमेश तोरसकर, देवयानी वरसरकर, मनिष दळवी आदी उपस्थित होते