प्रसाद कांबळे अपघात प्रकरण

महसूल विभागाचा बेकायदेशीरपणे खडी वाहतूक , क्रशर उद्योगांना अभय..? | ग्रामस्थांचा आरोप | ॲट्रॉसिटीची मागणी
Edited by:
Published on: January 17, 2025 18:58 PM
views 198  views

दोडामार्ग : कुडासे तिठा येथे अपघातात मृत झालेल्या मोर्ले येथील प्रसाद कांबळे याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या डंपर चालक व मालक यांच्यावर सदोष मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करून ॲट्रॉसिटी दाखल करा व त्या ठिकाणी असणाऱ्या तिन्ही जिल्हा वाहतूक पोलिसांवर गुन्हा दाखल करून नीलंबनाची कारवाई करा अशी मागणी करून ॲट्रॉसिटी दाखल करण्यासंबंधि निवेदन देण्यात आले.

मात्र, यावेळी तहसील कार्यालय येथे ठिय्या मांडून आंदोलन कर्ते आक्रमक झाले. यावेळी उपस्थित पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे व दोडामार्ग पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी व तहसीलदार अमोल पोवार यांना लोकांच्या रोशाला सामोरे जावे लागले. जोपर्यंत गुन्हा दाखल करणार नाही तो पर्यंत इथून हलणार नसल्याची भूमिका यावेळी सर्वांनी घेतली होती. सदर डंपर चालक शशिकांत देसाई व मालक श्रीकांत केसरकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे पोलीसांनी सांगितल्यावर लोकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.  तसच २४ तासात ॲट्रॉसिटी गुन्ह्यांचा अभ्यास करून गुन्हा दाखल करण्याची देडलाईन देण्यात आली.

अपघाताच्या दुसऱ्या दिवशीही दोडामार्ग पोलिस ठाण्यात अपघातात दोषी असलेल्यांवर कारवाई होण्यासाठी शुक्रवारी सकाळीच १० च्या सुमारस कांबळे यांचे कुंटुंबीय, मोर्ले ग्रामस्थ तहसिल कार्यालयात ठाण मांडून होते. यावेळी तालुक्यात बेकायदेशीरपणे सुरु असलेली खडी, क्रशर व्यवसायिकांबाबत महसुल व पोलिस यंत्रणेचा कोणताच अंकुश नसल्याने अशाप्रकारचे अपघात आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत आवाज उठवणाऱ्यांच्याकडे महसुल विभागाचे दुर्लक्ष करत आहेत. तर बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्यांना ते अभय देत असल्याचा आरोप करण्यात आला.

यावेळी जि. प. चे माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, मोर्ले सरपंच संजना धुमास्कर, उपसरपंच संतोष मोर्ये, सरपंच सेवासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, मोर्लेचे माजी सरपंच गोपाळ गवस, यांसह विजय जाधव, गणपत जाधव, सागर कांबळे, लक्ष्मण आयनोडकर सुरेश जाधव, चंद्रकांत जाधव, धीरज जाधव, सखाराम कदम, अमित तांबुळकर, सावळाराम कांबळे, पंकज गवस, महेश चिरमुरे, भगवान गवस, दादा देसाई, रामदार मेस्त्री, रमेश गवस, मंगेश गवस, नामदेव गवस, कृष्णा सुतार, दिपक गवस, यांसह बरेच ग्रामस्थ उपस्थित होते.