राज्यस्तरीय स्पर्धेत कुंब्रल येथील प्रणव गवस प्रथम

Edited by: लवू परब
Published on: February 08, 2025 18:58 PM
views 154  views

दोडामार्ग : राज्यस्तरीय शालेय  स्पर्धा अकोला येथे संपन्न झाल्या आहेत. यामध्ये  शालेय पॉवरलिफ्टिग स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील वयोगटात प्रणव भिकाजी गवस याने ८८ किलो वजन उचलत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रिडा परीषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय शालेय  पावरलिफ्टींग स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्हयांतून अकरा स्पर्धक सहभागी झाले होते. 19 वर्षाखालील गटा मध्ये खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कूल बांदा इयत्ता 12 वी चा वाणिज्य विदयार्थी आहे. प्रणव भिकाजी गवस याने 66 किलो वजन उचलत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला.

 प्रणव गवस दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल येथील असून बांदा खेमराज मेमोरियल कनिष्ठ महाविद्यालयात 19 वर्षाखालील गटा तून इयत्ता 12  शिकत आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. 

 यापूर्वी झालेल्या जिल्हास्तरीय देवगड स्पर्धेत प्रथम तर कोल्हापुर येथे पार पडलेल्या विभागीय स्तरावर प्रथम आलेला होता. त्याच्या यशाबद्दल शालेय शिक्षक, मार्गदर्शक गावचे ग्रामस्थ मित्र परिवार याच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.