प्रमोद रावराणे यांचा 'आदर्श शिक्षण संस्थाचालक' पुरस्काराने गौरव

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 08, 2022 21:14 PM
views 519  views

वैभववाडी : भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांना 'वसंत स्मृती आदर्श शिक्षण संस्थाचालक' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांना मानपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले.

भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभाग यांच्या वतीने ठाणे येथे हा सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्याला आमदार निरंजन डावखरे, शिक्षक आघाडी कोकण विभाग अध्यक्ष एन. एम. भामरे, प्रदेश उपाध्यक्ष विकास पाटील व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात ते स्थानिक कमिटी सचिव म्हणून गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.