'एलसीबी'चे प्रमोद काळसेकर यांचे वादविवाद स्पर्धेत यश

कोकण परिक्षेत्रातून अभिमानास्पद कामगिरी
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 02, 2022 19:44 PM
views 421  views

सावंतवाडी :  मानव अधिकार जनजागृती प्रीत्यर्थ कोकण परिक्षेत्रामधील ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे हे ५ जिल्हे, नवी मुंबई व मीरा भाईंदर, वसई - विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची 'मानवी हक्क व पोलिसांची जबाबदारी' या विषयावर वादविवाद स्पर्धेचे आयोजन अपर पोलीस महासंचालक, (नागरी हक्क संरक्षण विभाग) महाराष्ट्र राज्य यांचे आदेशाने पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्तालय यांनी केले होते.

स्पर्धेत एकूण २६ स्पर्धक सहभागी झालेले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पो. हे. कॉ.  प्रमोद बाळकृष्ण काळसेकर  (नेमणूक - स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग) यांची निवड झालेली होती.

स्पर्धेत ५ जिल्हे व ३ पोलीस आयुक्तालयातील स्पर्धकांमधून पो. हे. कॉ. प्रमोद बाळकृष्ण काळसेकर यांचा द्वितीय क्रमांक आल्याने त्यांचा नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी गौरव केलेला आहे.

कविता गायकवाड पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) संदीप भोसले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग मनीष कोल्हटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक यांचे रिडर तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.