
कणकवली : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपचे प्रमुख तथा माजी आमदार प्रमोद जठार हे ३० ते ३१ मे दोन दिवसांत रत्नागिरी - सिंधुदुर्गाचा दौरा करणार आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त भाजपतर्फे रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून या कार्यक्रमांना श्री. जठार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
शुक्रवार ३० रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग युवा मोर्चा यांच्यावतीने कणकवली येथील प्रहार भवन येथे सकाळी १० वाजता युवा प्रेरणा मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला जठार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. देवगड तालुक्यातील विजयदुर्ग येथे आरमार सृष्टी उभारणे हे काम सिंधुरत्न समृद्ध योजनेतून मंजूर असून त्या कामाची पाहणी करण्यासाठी दुपारी २ वा. विजयदुर्ग येथे जठार हे अधिकाऱ्यासमवेत करणार आहेत. त्यानंतर राजापूर येथे पुरातन डच वखार नुतनीकरण करण्याचे मा. आमदार प्रमोद जठार यांच्या संकल्पनेतून पर्यटन प्रादेशिक योजनेतून साकारत आहे. कामाची पाहणी सायंकाळी ४ वा श्री. जठार हे अधिकाºयासमवेत आहेत.
शनिवार ३१ मे रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त राजापूर येथे पूर्व व पश्चिम मंडलाचा सकाळी ११ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, राजापूर या कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला जठार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त लांजा येथे उत्तर व दक्षिण मंडलाचा महिला सन्मान कार्यक्रमास जठार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.या दौºयात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप रत्नागिरी-सिंधुदुर्गतर्फे करण्यात आहे.