
कणकवली : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे उमेदवार प्रमोद जठार यांनी गुरुवारी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आशिर्वाद घेतले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधिमंडळात जाण्यापूर्वी प्रमोद जठार यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी खासदार नारायण राणे यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










