
दोडामार्ग : मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या मुख्य टप्प्याला सुरुवात झालीय. या अंतर्गत दोडामार्ग येथील मणेरी ग्रामपंचायत इथं तालुकास्तरीत मुल्यमापन समितीकडून मूल्यमापनास सुरुवात करण्यात आलीय. यातून ग्रामपंचायतीची विविधस्तरावर पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री पंचायत राज अभियान हा स्थानिक प्रशासनाला सक्षम करण्यासाठी, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि ग्रामीण विकासात नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी एक राज्य उपक्रम आहे. यातून ग्रामपंचायतीची विविध स्तरावर पुरस्कारसाठी निवड करण्याकरीता मुल्यमापनासाठी तालुकास्तरीय मूल्यमापन समिती स्थापन करण्यात आलीय. इंदापूर पं. स. चे गटविकास अधिकारी सचिन खुडे हे या समितीचे अध्यक्ष असून पंचायत विस्तार अधिकारी भिवाजी काळे, सांख्यिकी विस्तार अधिकारी संजीवकुमार मारकड, नरेगा विस्तार अधिकारी अजित घोगरे, कृषी विस्तार अधिकारी विश्वास मागाडे, जि. प. पुणे, फेलो निखील डोंबाळे, पत्रकार संतोष आटोळे हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.










