
सावंतवाडी : पोलीस स्थापना दिन निमित्त 2 जानेवारी ते 8 जानेवारी या कालावधीत स्थापना दिन सप्ताह संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलात विविध ठिकाणी साजरा होणार आहे. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग व अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सावंतवाडी यांचे मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस ठाणे तर्फे खालील प्रमाणे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.
यात २/१/२६ रोजी काही निमंत्रित शाळांमधील विद्यार्थ्यांकरता निबंध स्पर्धा १०.०० ते १२.०० या वेळेत RPD स्कूल येथे आयोजित केलेले आहे.तसेच मळगाव हायस्कूल येथे पोलिस कामकाज, सायबर क्राइम आणि शस्त्र बाबत माहितीपर भेट व प्रदर्शन. तर ३/१/२६ रोजी ०९.०० ते १४.०० वाजेपर्यंत - श्रीमान जगन्नाथराव भोसले उद्यान , तीन मुशी नाका या ठिकाणी पोलीस दलातील विविध विभागाच्या कामकाजाच्या पद्धतीचे माहिती नागरिकांना होण्याकरता सायबर, बॉम्ब शोध व नाशक पथक, भरोसा सेल, वाहतूक विभाग, शशास्त्र विभाग तसेच पोलीस वाद्यवृंद पथक यांचे स्टॉल उभारून जनतेला त्याबाबत माहिती दिली जाणार आहे. यामध्ये येणारे विद्यार्थी , नागरिक यांच्या संख्येच्या अनुषंगाने वेळ वाढविण्यात येईल.
४/१/२६ रोजी सायंकाळी १६.०० पासून पोलीस, पत्रकार, पोलीस पाटील इतर शासकीय विभाग अशा निमंत्रित संघाच्या हॉलीबॉल स्पर्धा पोलीस स्टेशन समोरील मैदानावर आयोजित केल्या आहेत.५/१/२६ रोजी सकाळी ०६.३० वाजता मोती तलाव परिसरात "मॉर्निंग वॉक" कार्यक्रम पत्रकार, पोलिस, विद्यार्थी, व शासकीय विभाग कर्मचारी यांचे समवेत.६/१/२६ रोजी सायंकाळी १७.०० ते २२.०० पर्यंत पोलीस ठाणे आवारात ज्येष्ठ नागरिक मेळावा व पोलिस भगिनी व निमंत्रित महिला मंडळाकरीता विविध स्पर्धा व मनोरंजनात्मक खेळ.७/१/२६ रोजी पोलीस ठाण्यातील सभागृहात - रक्तदान शिबिर हे रोटरी क्लब सावंतवाडी व अन्य रक्तदाता/पुरवठा संघटनाच्या सहकार्याने आयोजित केले असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी त्यात सहभागी व्हावे असे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात येत आहे. या याव्यतिरीक्त विविध शाळांची पोलिस ठाण्यास भेट व प्रत्यक्ष कामकाजाची माहिती देण्यात येणार आहे. नमूद कार्यक्रमात सर्व नागरिकांनी विविध सामाजिक संघटनांनी सहभागी होऊन सहकार्य करावे अशी विनंती सावंतवाडी पोलीस ठाण्यातर्फे करण्यात येत आहे.










