इतिहासाचे अभ्यासक प्रकाश नारकर यांचं निधन !

Edited by: भरत केसरकर
Published on: September 09, 2023 11:11 AM
views 184  views

कुडाळ : कसाल बाजारपेठ येथील रहिवासी इतिहासाचे अभ्यासक ज्येष्ठ संघ स्वयंसेवक प्रकाश भाऊ नारकर (६८) यांचे शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ वाजता त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.

    प्रकाश नारकर हे एक चालते बोलते इतिहास होते. प्रकाश नारकर यांनी आपल्या या आयुष्य कालवधित खूप संस्थांवर काम केलं.ते कसालं बाजारपेठेतील श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कार्याध्यक्ष, न्यू इंग्लिश स्कूल, कसाल चे निवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक, कोंकण इतिहास परिषदेचे जिल्हाध्यक्ष, इतिहास संकलन समितीचे जिल्हा संयोजक, रां.स्व.संघाचे सिंधुदुर्ग जिल्हा माजी प्रचार विभाग प्रमुख, नारुर येथील बालभैरव मंदिर निर्माते, डिस्कव्हरी ऑफ सिंधुदुर्ग, अखिल भारतीय गिर्यारोहक संघटना जिल्हाध्यक्ष, शारदा ग्रंथालय, कसालचे संस्थापक अध्यक्ष अशा अनेक भूमिका ते यशस्वीपणे सांभाळत असत.