
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांसाठी स्नेह मेळावा तसेच पत्रकारांच्या इयत्ता दहावी आणि बारावी मधील उत्तीर्ण पाल्यांचा गुणगौरव समारंभ रविवार दिनांक 18 मे रोजी सायंकाळी ५ ते ९ या कालावधीत होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने रविवारी पत्रकार संघाशी सलग्न सर्व पत्रकारांचा सहकुटुंब स्नेह मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव केला जाणार आहे. ज्या पत्रकारांच्या मुलांनी आत्ताच निकाल जाहीर झालेल्या इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये गुणवत्ता प्राप्त केली आहे. अशा सर्व मुलांचा गुणगौरव केला जाणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या नवनिर्वाचित अध्यक्ष यांचाही सत्कार केला जाणार आहे. याचबरोबर पत्रकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच स्नेह भोजनही होणार आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन मध्ये हा समारंभ होणार आहे. जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, सचिव बाळकडपकर यांनी केले आहे.