मानाच्या पैठणीची मानकरी ठरली प्राची धुरी

Edited by:
Published on: February 02, 2025 15:15 PM
views 249  views

देवगड : तळेबाजार येथे श्री .गणेश जयंती निमित्त गणेश उत्साही मंडळ आयोजीत होम मिनिस्टर स्पधेत प्राची मिलींद धुरी मानाची पैठणीची मानकरी ठरली तिला मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सहा हजाराची मानाची पैठणी देऊन गौरवले. तळेबाजार येथे श्री गणेशाच्या ३४व्या वर्धापण दिन सोहळ्यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सर्वांचे लक्ष लागलेल्या होम मिनिस्टर स्पधेत प्रथम क्रमांक प्राची मिलींद धुरी , द्वितीय क्रमांक अनिषा गजानन कुबडे, तृतीय क्रमांक अश्विनी महादेव इथापे यांनी पटकावला . या संपुर्ण स्पधेच आयोजन रोहीत म्हापसेकर , प्रिया म्हापसेकर , दत्तप्रसाद  जोईल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले .या स्पधेच सुत्रसंचलन ऋत्विक धुरी  यांनी केल .

या नंतर दुसरी नाविन्यपुर्ण स्पर्धा खोबरे किसने स्पधेत प्रथम क्रमांक मनिषा ऋषिकांत धुरी , द्वितीय क्रमांक सुनिता संतोष कुबडे , तृतीय क्रमांक प्रियंजना संजय परब यांनी पटकावला. देवगड तालुक्यातील महिलांनाही  पैठणीची संधी मिळावी यासाठी २० रूपयांत लकी कुपनद्वारे पैठणीचे आयोजन करण्यात आले होते यात प्रथम क्रमांक वरेरी गावची साक्षी संतोष बावकर , द्वितीय क्रमांक तळेबाजारची करिश्मा संजय रुमडे तर तृतीय क्रमांक शिरगाव गावची अंगणवाडी सेविका दिव्या दत्ताराम भस्मे यांनी पटकावला .

या सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले . या बक्षिस वितरण सोहळ्यात व्यासपिठावर गणेश उत्साही मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर , उपाध्यक्ष अनिल मोंडकर, कार्यवाह संजय रुमडे , वरेरी गावचे माजी सरपंच संदीप तेली , सचिन हिंदळेकर , एकनाथ घाडी , रोहण म्हापसेकर, दत्तप्रसाद जोईल, नंदन घोगळेसर आदी मान्यवर उपस्थित होते .