प्रभाकर सावंतांची आचरेकर कुटुंबियांना मदत !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 26, 2024 14:39 PM
views 252  views

आचरा : आचरा भंडारवाडा येथील निलेश प्रभाकर आचरेकर यांच्या घरावर माड पडून घराचे मोठे नुकसान झाले होते. मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यास आचरा येथे आलेल्या भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना कार्यकर्त्यांनी सांगताच श्री सावंत यांनी  तात्काळ तत्परता दाखवत आचरेकर यांच्या घरी भेट दिली. झालेल्या  नुकसानीची पाहणी करत त्यांना आर्थिक मदत केली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, चिंदर शक्ती केंद्र प्रमूख दत्ता वराडकर, आचरा उपसरपंच संतोष मीराशी यासह अन्य उपस्थित होते.