
मुंबई : भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपा, महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी बावनकुळे यांनी सिंधुदुर्गमध्ये लोकसभा व विधानसभा निवडणूकित भाजपाला जे यश मिळाले तसेच भाजपची जिल्ह्यातील वाढलेली संघटनात्मक स्थिती याबाबत जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे कौतुक करून लवकरच जिल्ह्यात येणार असल्याचे सांगितले.