
सिंधुदुर्गनगरी : भारतीय जनता पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी पुन्हा प्रभाकर सावंत यांना संधी मिळाली आहे. राज्यभरातील अध्यक्षांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी चैनसुख संचेती यांनी जाहीर केली आहे. भाजप सत्तेतील हा सुवर्णकाळ असून विकास कामांना गती देण्यासाठी हे पद महत्त्वाचे मानले जाते.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभाकर सावंत यांनी गेली दोन वर्ष चांगल्या कामाची छाप या जिल्ह्यात उमटवली आहे. नारायण राणे हे भाजपाचे पहिले खासदार म्हणून निवडून आले, त्यानंतर महायुतीचे तिनही आमदार मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. राज्यात व केंद्रा भाजपचे सरकार असून सुवर्णा काळात प्रभाकर सावंत सावंत यांनी भाजपाची प्रतिमा उंचावण्याचा चांगला प्रयत्न केला. तीनही विधानसभा मतदारसंघातील भाजप बुथ रचनेची बांधणी व भाजप सदस्यता अभियान नोंदणी कार्यक्रम यातही त्यांचे फार मोठे योगदान आहे.
भाजपच्या सुवर्णकाळात आपणाला जिल्हाध्यक्ष म्हणून संधी मिळाली त्या संधीचे सोने करता आले, या जिल्ह्यात पक्षीय चळवळ चांगल्या पद्धतीने उभी करता आली. गावागावातील विकास कामे व जनतेशी सुसंवाद या पदावर काम करताना साधता आला. पुढच्या काळात भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिक काम करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वसामान्य जनतेसाठी चांगले काम करीत आहे व हे काम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हे पद एक चांगली संधी आहे. पुढच्या काळात या पदाचा वापर जनतेसाठी सुरूच राहील असे सांगतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याच्या कॅबिनेट मंत्री नितेश राणे,कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप नेते प्रमोद जठार, अतुल काळसेकर या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू असे प्रभाकर सावंत म्हणाले. गेली दोन वर्षे सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे संघटनात्मक काम उत्तम झाले,प्रदेशाने याची दखल घेतली या सर्व बाबींचे श्रेय हे माझ्या सहकारी पदाधिकारी आणि प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याला जाते असे ही प्रभाकर सावंत यांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या फेरनिवडीनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.