
सिंधुदुर्ग : नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा रविवार दिनांक 09 जून रोजी दिल्ली येथे मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी देशातील सर्व भाजपा जिल्हाध्यक्ष यांना विशेष निमंत्रित केलेले आहे.
भाजपचे प्रदेश पदाधिकारी,सर्व खासदार आणि आमदार हे सुद्धा सदर सोहळ्याला निमंत्रित आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,आमदार नितेश राणे,संघटनमंत्री शैलेंद्रजी दळवी हे या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली.