
सिंधुदुर्ग : भाजपचे राज्यातील जिल्हाध्यक्ष जाहीर झाले आहेत. भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी प्रभाकर सावंत यांची निवड झाली आहे.
१६ मे ला सिंधुदुर्ग नविन जिल्हाध्यक्ष पदाची घोषणा होणार होती. यानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर ही निवड जाहीर करण्यात आली आहे. सध्या मावळते जिल्हाध्यक्ष राजन तेली हे कार्यरत होते. प्रभाकर सावंत यांच्या रूपाने भाजपला नविन जिल्हाध्यक्ष लाभले आहेत. प्रभाकर सावंत हे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या निवडीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.