
सावंतवाडी : सावंतवाडी सबनिसवाडा येथील एकमुखी दत्त मंदिर मध्ये प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी पुण्यतिथी आषाढ शुद्ध प्रतिपदा सोमवार दि. १९ जून रोजी साजरी करण्यात येणार आहे.
यावेळी सकाळी श्री एकमुखी दत्त मंदिर व टेंबे स्वामी मंदिर अभिषेक, पूजा मंत्र घोष, दुपारी १ वाजता आरती, १:३० नंतर महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ७:२५ नामस्मरण, ७:३० वाजता आरती नंतर पालखी सोहळा, रात्री ८:३० श्री दत्त भक्तांचे भजन होईल.सर्व दत्त भक्तांनी उपस्थित राहून श्री दत्त सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.