सत्तासंघर्ष | सच्चेपणा हीच खरी ताकद | माझा विजय पक्का ; जनता माझ्यासोबत..!

परमे-पणतुर्लीच्या थेट सरपंचपदाचे उमेदवार राजू उसपकर यांना विश्वास
Edited by: संदीप देसाई
Published on: December 13, 2022 18:03 PM
views 182  views

दोडामार्ग : गेल्या पंधरा वर्षात ज्या अपेक्षेने गावचा विकास व्हायला पाहिजे होता, त्यात तथाकथित राजकारण्यांनी आणि सत्ता उपभोगणाऱ्या महोदयांनी म्हणावा तसा गावचा विकास केलेला नाही. म्हणूनच विकासात मागे पडलेला परमे पणतूर्ली गाव ग्रामविकासात आघाडीवर आणण्यासाठी मला पुन्हा एकदा समाज करणात सक्रिय व्हावे लागतेय. प्रामाणिकता व  सच्चे पणा ही माझी ताकद आहे, त्यामुळे याच जोरावर आणि गेल्या २० वर्षांपूर्वी गावच्या विकासासाठी जी मेहनत घेतली ती पुन्हा पुढे नेण्यावर माझा भर आहे. म्हणूनच मी आता थेट सरपंच पदाच्या निवडणूकित उतरलो असून जनता माझ्या मागे आहे, असा विश्वास राजेंद्र उसपकर यांनी व्यक्त केलाय.

  माझा गाव १५ वर्षे मागे राहिला ती कमतरता मला भरून काढायची आहे. मला निस्वार्थी काम कारायचंय, सच्चेपणा ही माझी ताकद आहे, आणि म्हणूनच पुन्हा २० वर्षांनी मी पुन्हा एकदा गावच्या विकास प्रवाहात येण्यासाठी थेट सरपंच पदाच्या निवडणकीला सामोरे जात आहे. गेल्या २० वर्षांपूर्वी ग्रामपंचायत सदस्य म्हणून आणि एक युवा कार्यकर्ता म्हणून परमे-पणतुर्ली गावात केलेली विकास कामे मी पुन्हा एकदा लोकांसमोर मांडणार आहे, मला माझ्या गावचा खरा विकास करायचा आहे म्हणूनच मी निवडणूक लढवीत आहे, पणतुर्ली वासीयांनी तर मला आशीर्वाद दिलाच आहे आता माझे परमेवासीय सुद्धा मला नक्कीच या निवडणुकीत मतदानाचा आशीर्वाद देतील असे सणाग्त त्यांनी आजवर परमे गावासाठी केलेल्या विकासकामांचा उलगडा केला. 

राजू उसपकर यांनी २००१ से २००५ दरम्यान परमे-पणतुर्ली ग्रामपंचायत मध्ये सदस्य असताना केलेल्या कामांची माहिती जाहिरनाम्यात माहिती दिली आहे. यात संपूर्ण ग्रामीण योजनेखाली देवतळी दुरुस्ती काम मंजूर केली १५०००रु., दुरुस्तीसाठी १० हजार रुपये, इंदिरा आवास योजनेतून पाच ग्रामस्थांची प्रकरणे, जवाहर योजनेतून विहीरीसाठी चार प्रस्ताव, पाण्यासाठी व शेतीसाठी परमे व पणतुर्ली गावात बंधारे मंजूर केले, यशवंत ग्रामसमृध्दी योजनेतून फणसवाडी व हरीजनवादी साठी रस्ता मंजूर केला, पणतुर्ली देऊळवाडी ते गावठणवाडी ४०० मीटर रस्ता मंजूर केला. संजय गांधी योजनेतून गावातील पाच लोकांची प्रकरणे मंजूर केली, खासदार सुरेश प्रभू यांना परमे गावात आणून ग्रामसडक योजनेतून साटेली ते परमे पर्यंत रस्ता व तिलारी नदीवर पूल मंजूर केला, गावातील कोंडावरचे तसेच देऊळजवळचे पाईप घालून मोरीची कामे केली, शाळेकडील मोरी व टेंबवाडीवर जातानाची मोरी मोटे पाईप घालून बांधण्यात आली, सुरेश दळवी यांच्या जि. प. अध्यक्ष कारकीर्दीत गावासाठी नळयोजना मंजूर केली अशी कामे नमूद केली आहेत. तर येत्या पाच वर्षात आपण पुढील कामे प्राधान्याने करणार असल्याचा अजेंठा ठेवला आहे. यात पणजी-म्हापसा अशी सासोली-पणतुर्ती-कुडासे-भेडशीते परमे कदंबा बस सुरु करणे, पणतुर्ली गावातील महिला बचत गटांना एकत्रीत बसून काम करण्यासाठी हॉल बांधणे,

पणतुर्ली देवळाजवळ जाताना उंच कॉजवे पूल बांधणे व डांबरीकरण करणे, परमे बचत गटांना एकत्रीत बसण्यासाठी हक्काची जागा व कामाची योजना व जागा बांधून देणे. फणसवाडी ते देऊळवाडी हरीजनवाडी रस्ता डांबरीकरण, परमे-पणतुली गाव जोडण्यासाठी रस्ता मंजूर करणे, गरीब गरजूना जनतेला घरकूल योजना मंजूर, गावात आरोग्याच्या विषयी सुविधा, मागासवर्गीय लोकाची कामे वेळेवर करणे, लाईटची कामे परीपूर्ण करणे,  देवळाजवळचे कॉजवे पुल व कोंडावरचे कॉजवे पुल नवीन बांधून उंची वाढवणे, शिल्लक असलेले रस्ते मंजूर करून डांबरीकरण करणे, एस. टी. बस सेवेची वेळ (टायमिंग) निश्चित ठरवून ती चालू करणे, विकासापासून दूर ठेवण्यात आलेल्या फणसवाडीची हक्काची कामे मंजूर करणे, हरिजनवाडी, मडाळवाडी यांना कायम स्वरुपी रस्ता मुख्य रस्त्याला जोडणे, परमे गावात कायम स्वरुपी डॉक्टरची सोय उपलब्ध करणे, गावातील मुलांना खेळण्यासाठी मैदान तयार करणे आदि कामे आपण सरपंच म्हणून करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले आहे. 

    स्वच्छ व पारदर्शी कारभार आणि समाजसेवक म्हणून जनतेची प्रामाणिक सेवा करण्यासाठी आपण अविरत मेहनत घेणारा सच्चा कार्यकर्ता असल्याने यावेळी नक्कीच आपल्याला परमे-पणतुर्लीवासीय साथ देतील अशी आशा राजू उसपकर यांनी व्यक्त केली आहे.