
सिंधुदुर्ग : संपुर्ण कुडाळ तालुक्याला विद्युत पुरवठा करणा-या दोन मुख्य अति उच्चदाब वाहिन्यात अज्ञातांकडून जाणीवपुर्वक बिघाड निर्माण करुन विद्युत पुरवठा खंडीत करण्याची घटना काल रात्री ११.०० वाजता घडली. त्यामुळे कुडाळ व मालवण या भागातील महावितरण कंपनीचे अंदाजे एक लाख ग्राहक बाधीत झाले.
हे कृत्य निदंनीय असून धोकादायक सुध्दा आहे. त्यामुळे प्राणांतीक अपघात होऊ शकतो व तसे झाल्यास महापारेषण कंपनी त्यासाठी जबाबदार राहाणार नाही. याबाबत पोलीसात तक्रार नोंदविण्यात आली आहे. तसेच जनतेस अशा प्रवृत्तीना परावृत्त करण्याचे महापारेषणकडून आव्हान करण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात कुडाळ तालुक्यास पर्यायी मार्गाने विज पुरवठा चालू करण्यात यश आले. तद्नंतर महापारेषण कंपनीच्या अधिकारी व कर्मचा-यांनी अविरत काम करुन विदयुत पुरवठा आज सकाळी ७.०० वाजता पुर्ववत केला आहे अशी माहिती महावितरण कंपनीकडून देण्यात आली आहे.










