
सिंधुदुर्गनगरी : वैद्यकिय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था मुंबई, डॉ. पल्लवी सापळे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग या संस्थेस भेट दिली. यावेळी सह डॉ. पल्लवी सापळे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग या संस्थेस भेट देऊन आढावा बैठक घेतली.
सर्व प्रथम कॉलेज कौन्सिल सभेमध्ये संस्थेचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी संस्थेच्या विविध कामकाजाबाबत स्थितिदर्शक सादरीकरण केले. संस्थेस सन २०२५-२६ या वित्तीय वर्षात राज्य योजने अंतर्गत व जिल्हा नियोजन समिती मार्फत खरेदी करण्याकरिता आवश्यक असणाऱ्या यंत्रसामुग्रीचे प्रस्ताव शासनास लवकरात लवकर सादर करण्याबाबत. सह संचालक डॉ. पल्लवी सापळे यांनी सूचना दिल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे नुकतेच जनरल मेडिसिन, ऍनेस्थेशिया व स्त्रीरोगशास्त्र या विषयांमध्ये डीएनबी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु झाले असून एकूण ४ पदव्युत्तर विद्यार्थी प्रवेशित झाले असल्याची माहिती अधिष्ठाता यांनी दिली असता संस्थेमध्ये सर्वच विषयांमध्ये एम.डी., एम.एस. पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याची आवश्यकता असून त्याबाबत लवकरच कार्यवाही करण्याबाबत मा. सह संचालक यांनी सूचना दिल्या. विद्यार्थ्यांच्या व्याख्यानगृहाला भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. डॉ. सापळे यांनी त्यानंतर रुग्णालयाचा राउंड घेतला, लघुशस्त्रक्रियागृहाच्या नियोजित जागेची पाहणी केली.
अपघात कक्षाला भेट देऊन कार्यरत डॉक्टर्स व नर्सेस यांचेशी संवाद साधून रुग्णांविषयी विचारपूस केली. रुग्णालयामध्ये हाय डिपेन्डन्सी युनिट सुरु करण्याबाबत त्यांनी अधिष्ठाता यांना सूचना दिल्या.