पोस्ट कर्मचा-यांनी साजरा केला योग दिन

Edited by: दिपेश परब
Published on: June 21, 2024 10:02 AM
views 298  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला येथील पोस्ट अधिकारी व कर्मचा-यांनी निसर्गाच्या सान्निध्यात शहरातील झुलता पुल येथे योग दिन साजरा केला. सर्वत्र योगदिन साजरा करत असतानाच पोस्टाचे अधिकारी व कर्मचा-यांनीही वेळात वेळ काढून योगदिनानिमित्त विविध आसने केली. यांना योग शिक्षिका वृंदा मोर्डेकर यांनी मार्गदर्शन करीत योगाची विविध आसने करवून घेतली. योगाच्या मार्गदर्शनाबद्दल पोस्ट खात्यातर्फे मोर्डेकर यांचे आभार मानले.