
मंडणगड : खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या सुचनेनुसार , तालुक्यातील नारगोली येथील भुसख्खलनाच्या ठिकाणी महसुल विभागाने पाहणी केली असून येथे तात्काळ संरक्षक भिंत उभारणीची आवश्यक व्यक्त करुन तशा सुचना संबंधीत विभागास देण्यात आल्याची माहीती राष्ट्रवादी कॉंग्रेस पाटीचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राकेश साळुंख यांनी दिली आहे. मंडणगड पालवणी दापोली राज्य महामार्गावर नारगोली या ठिकाणी रस्त्याचे लगत दरड खाली येण्याची शक्यता असल्याने व दरडीमध्ये नारगोली येथील घरे प्रभावीत होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी या ठिकाणी संरक्षक भिंतीची मागणी केली होती.
पावसाळी आपत्तकालीन स्थितीत भुसख्खलन झाल्यास तिथे घरांना धोका निर्माण होऊन, राज्य महामार्गावरील वाहतूक बंद पडण्याचा धोका आहे. त्यामुळे या मार्गावरील सर्व गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटू शकतो. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड. राकेश साळुंखे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे ही समस्या सांगीतली त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी महसुल विभागास या समस्येसंदर्भात तात्काल कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यामुळे काही दिवसापुर्वी तहसिलदार अक्षय ढाकणे यांच्या निर्देशाने महसुल विभागाने केलेल्या पंचनाम्याकरिता ग्रामस्थ शंकर पांढरे, अजीत पांढरे, कोथेरे तलाठी, संजय गावकर व राकेश साळुखे उपस्थित होते. यावेळी पंचयादी करण्यात आली आहे. महसुल विभागाने येथे सरंक्षक भितींची गरज असल्याचे बाब संबंधीत विभागाची निदर्शनास आणुन दिल्याने बांधकाम विभाग नेमकी कोणती कार्यवाही करतो याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.