दोडामार्गात रेशनवरून निकृष्ट धान्य पुरवठा

नागरिक संतप्त
Edited by: संदीप देसाई
Published on: December 28, 2023 11:45 AM
views 400  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात महसूल विभागाच्या पुरवठा शाखेकडून राशनिंग धान्य दुकानामार्फत सर्वसामान्य जनतेला पुरवण्यात येणारा धान्य पुरवठा अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याचा धक्कादायक बाप समोर आली आहे. अनेक गावांमध्ये धान्य दुकानदार अळी लागलेला तांदूळ पुरवठा करत असल्यामुळे नागरिकांकडून तीव्र भावना व्यक्त होत आहेत.

   प्रशासनाला जर असा अळी लागलेला निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवठा जनतेला करायचा होता तर तो न केलेलाच बरा अशाही संतत्प भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर काहींनी तहसिलदार संकेत यमगर यांच्याशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली असता. पुढील महिन्यापासून असे धान्य वितरित केले जाणार नाही. याबाबत प्रशासन काळजी घेईल असे आश्वासन दिलं आहे. शिवाय सर्वच धान्य असे असणारं नाही असाही खुलासा केला आहे. तर नागरिकांत तीव्र भावना असून याबाबत काही सामाजिक व राजकीय कार्यकर्ते प्रशासनाला याचा जाब विचारण्याच्या सुद्धा तयारीत आहेत.