स्वानंद सुंदरी स्पर्धेतपूजा सावंत प्रथम

क्रिएटिव्ह सखी बांदाचं आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: January 16, 2024 08:41 AM
views 115  views

सावंतवाडी : क्रिएटिव्ह सखी बांदा आयोजित स्वानंद सुंदरी स्पर्धेत प्रथम क्रमांक पूजा सावंत सावंतवाडी, द्वितीय क्रमांक माधवी शहापूरकर ओरोस, तर तृतीय क्रमांक श्रावणी बिपिन एडवे  बांदा,यांना मिळाला,उत्तेजनार्थ  प्रथम क्रमांक नव्या फुलारी दोडामार्ग, गौतमी गोवेकर बांदा यांना देण्यात आला.

       स्वानंद सुंदरी स्पर्धेचे उद्घाटन मराठी सिने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महिला सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भाजपा श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, सुप्रिया वळंजू, फोजीया खतीब, धनश्री धारगळकर, क्रिएटिव्ह सखीच्या  अध्यक्ष अंकिता स्वार, अमिता स्वार आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे येथील सखीच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. व्यासपीठावरील मान्यवरांमधील वैष्णवी कल्याणकर, श्वेता कोरगावकर, अमिता स्वार, अंकिता स्वार, माजी जिल्हा व आरोग्य कल्याण सभापती प्रमोद कामत, डेगवे  सरपंच राजन देसाई यांनी क्रिएटिव्ह  सखीच्या कार्यक्रमास  शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.क्रिएटिव्ह सखीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीनच सुरू केलेल्या स्पर्धेत  मॉम अँड चाइल्ड प्रथम क्रमांक आरती परब मुलगी युक्ता परब पेडणे गोवा, द्वितीय क्रमांक पूजा पिंगुळकर मुलगा शार्विल पिंगुळकर, तृतीय क्रमांक नम्रता नेवगी मुलगी सृष्टी नेवगी सावंतवाडी.

त्याचप्रमाणे ग्रुप डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक रॉकस्टार ग्रुप बांदा, द्वितीय क्रमांक प्रेरणा महिला मंडळ बांदा, तृतीय क्रमांक विभागून देवेद्य महिला मंडळ आणि जोगवा ग्रुप बांदा. स्पर्धेच्या परीक्षणासाठी मधुरा नाईक दोडामार्ग, रिया कांबळे गोवा सोनाली पारकर कणकवली तसेच कोरीओग्राफर म्हणून  अनिकेत आसोलकर सावंतवाडी, अभिजीत आणि खुशी यांनी काम केले. ग्रुप डान्स परीक्षक दीपा कुबडे अनिकेत आसोलकर यांनी परीक्षण केले.