
सिंधुदुर्गनगरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 268- कणकवली, 269- कुडाळ, 270- सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्राच्या ठिकाणांना भारत निवडणूक आयोगाने खालीलप्रमाणे मान्यता दिली, असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी दिली आहे.
मतदार संघाचे नाव, कंसात मतमोजणी केंद्राचे ठिकाण
268- कणकवली विधानसभा मतदार संघ (कणकवली कॉलेज कणकवली, HPCL हॉल, तळमजला कणकवली.)
269- कुडाळ विधानसभा मतदार संघ (तहसिलदार कार्यालय कुडाळ येथील मध्यवर्ती सभागृहाची जागा)
270- सावंतवाडी विधानसभा मतदार संघ (तहसिलदार कार्यालय सावंतवाडी येथील आतील मोकळा पॅसेज) अशी आहेत.