चर्चा तर होणारच | किरण सामंतांचा 'मशाल' स्टेटस | कोकणातलं राजकारण बदलणार..? | फक्त चर्चाच रंगणार..?

Edited by: भरत केसरकर
Published on: September 29, 2023 14:39 PM
views 939  views

रत्नागिरी : भरत केसरकर : किरण सामंतानी मशाल चिन्हाचे स्टेटस ठेवल्याने या मशाल चिन्हावरून महाराष्ट्रात राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. किरण सामंत यांनी आज आपल्या मोबाईलच्या स्टेटसला मशाल चिन्ह स्टेटस ठेवत एकच राजकीय धमाका उडून दिला. त्यामुळे ऐन गणेश चतुर्थीच्या 11 व्या दिवशी कोकणामध्ये राजकीय शिमगा पाहायला मिळाला.

मात्र, दोन तासात त्यांनी हे चिन्ह स्टेटस डिलीट करत आपली भूमिका स्पष्ट केली. किरण सामंत यांनी यानंतर मीडियाशी बोलताना उदय सामंत यांचं करियर उध्वस्त होता नये हे डोळ्यासमोर बघून आपण हे चिन्ह  स्टेटस डिलीट करत असल्याचे मीडियाशी बोलताना म्हटल आहे. मात्र, किरण सामंत यांनी इशारा दिलाय की जे कोण आपलं झाकून ठेवतात आणि दुसऱ्याचा वाकून बघतात त्यांना योग्य वेळी मी उत्तर देईन आणि निश्चितच वेळ आली तर धमाका करीन. असा इशारा दिला आहे.

त्यामुळे किरण सामंत  यांचा नेमका इशारा कोणाला? हे आता काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. मात्र किरण सामंत यांच्या या भूमिकेमुळे तळ कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजकीय भूकंप पुन्हा होतो की काय? असं चिन्ह निर्माण झाल आहे. उदय सामंत यांनी गणेश चतुर्थीच्या चौथ्या दिवशी किरण सामंत हे शिवसेनेचे उमेदवार असू शकतात हे स्पष्ट केल्यानंतर, सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेची जागा भाजपच लढवणार असल्याचा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिला होता. तर त्याच धरतीवर पत्रकार परिषदेत भाजपचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी जर उदय सामंत यांना आपले बंधुराज किरण सामंत यांना या मतदारसंघाचे उमेदवार म्हणून बघायच असेल तर आणी  जर तस वाटत असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावं आणि कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी. असा थेट इशारा दिला होता.

या इशाऱ्या नंतर दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया देत उगाच कोणी प्रतिक्रिया देत बसू नये. असं म्हटलं होतं.याला शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी या जागेवर शिवसेना भाजपसोबत युतीतून जी जागा लढवेल असं स्पष्ट केलं होतं. मात्र, या सगळ्या घडामोडी किरण सामंत हे पुन्हा आज आक्रमक झालेले पाहायला मिळाले. कधीही मीडियासमोर न बोलणारे आज किरण सामंत यांनी मशाल चिन्हाचा स्टेटस लावून डिलीट केल्यानंतर काही वेळातच रत्नागिरीमध्ये ते आपल्या समर्थक कार्यकर्त्यासोबत मीडियाला सामोरे गेले.

किरण सामंतांच्या या मुलाखतीनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे. त्यांनी आपल्या मुलाखतीत स्पष्ट केले की उदय सामंत यांची राजकीय कारकीर्द नष्ट होऊ नये किंवा त्यांना त्रास होऊ नये यासाठीच आपण ते स्टेटस डिलीट करत असल्याचे म्हटले आहे. मात्र, योग्य वेळ आल्यानंतर मी बोलेन असा इशारा देत जे कोण दुसऱ्याच झाकून आणि वाकून बघतात आणि स्वतःच झाकून ठेवतात त्यांना इशारा दिला आहे. त्यामुळे हा रोख नेमका किरण सामान यांचा कोणावर आहे? या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे गणेश चतुर्थी नंतर निश्चितच रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये राजकीय उलथापालत होते का? आणि किरण सामंत हे पुन्हा उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करतात का? आणि तेथून जी जागा लढवतात का? ते पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे.