जिल्हाप्रमुखाची तालुकाप्रमुखाला श्रीमुखात मारण्याची धमकी !

पक्षातील अंतर्गत गटबाजी उघड
Edited by: भरत केसरकर
Published on: March 28, 2024 06:10 AM
views 1732  views

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रात सत्तांतर करून दोन वर्षा पुर्वी सत्तेत आलेल्या एका मोठ्या पक्षात अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे.या सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांने आपल्याच एका तालुकाप्रमुखाच्या श्रीमुखात मारण्याची धमकी दिली आहे.या धमकीने तो तालुकाप्रमुख चांगलाच बिथरला आहे.तर दुसरा तालुका प्रमुखास हकालपट्टीची धमकी दिली आहे.तर अन्य युवक तालुकाप्रमुखास तुझी गरज नाही,चालता हो.अशी थेट धमकी दिली आहे. यामुळे या जिल्हाप्रमुखाच्या वागण्याने पक्षातील अंतर्गत गटबाजी उघडकीस आली आहे. 

      एका पक्षाची महत्वपूर्ण बैठक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका मोठ्या शहरात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.या बैठकीत सभेतील हल्लीच एका सभेतील एक भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झालयावरून हा विषय या बैठकीत आला आणि चांगलेच रणकंदन आपआपसात सुरू झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या तालुक्याचा एक तालुकाप्रमुख यात ट्रोल झाला. या तालुकाप्रमुखाने एक मुळ पक्ष स्थानिक आमदाराला कंटाळून सध्याच निर्माण झालेल्या पक्षात प्रवेश केला होता.त्याला मुंबई मध्ये नेत "एक" नाथ यांच्या हस्ते पक्ष प्रवेश देण्यात आला होता.यानंतर एक तालुकाप्रमुख असलेल्या या तालुक्यात दोन तालुकाप्रमुख करण्यात आले.यानंतर एक मेळावा आयोजित करण्यात आला.पण या मेळाव्यात स्वकीयानीच गेम करत पैशाचा व्यवहाराबाबत एक व्हिडिओ व्हायरल केला.यानंतर या पक्षातील बरेचजण ट्रोल झाले होते.

     याची दखल काल झालेल्या बैठकीत घेण्यात आली.हा विषय या बैठकीत चर्चेला आला.यात जिल्हाप्रमुखाचा पारा चढला आणि त्यांनी थेट श्रीमुखात मारण्याची भाषा केली.या घटनेने या तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले आहेत.या तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या जिल्हाप्रमुखास त्या तालुक्यात न येण्याचेही आव्हान दिले असल्याचे समजत आहे.

      

वीज कनेक्शन तोडल्याने तालुका कार्यालय अंधारात

      या पक्षाचे एक तालुका कार्यालयाचे वीज कनेक्शन वीज बील न भरल्याने तोडण्यात आले आहे.दोन ते चार दिवस होऊन सुद्धा वीज कनेक्शन बंद अवस्थेत आहे.महाराष्ट्रातील सत्तेतील ऐवढा मोठा पक्ष असूनही लाईट बील न भरल्याने अंधारात राहण्याची पाळी ता पक्षावर आली आहे. एकदंरीत या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

     या घटनेनंतर या पक्षातील दोन मातब्बर मंत्री काय निर्णय घेतात? याकडे आता सर्वाचे लक्ष्य लागून राहिले आहे.