राजकीय नेत्यांनी घेतलं श्री भावई देवीचे दर्शन...!

Edited by: विनायक गावस
Published on: March 31, 2024 10:24 AM
views 142  views

सावंतवाडी : कुणकेरी गावातील सुप्रसिद्ध हुडा उत्सवास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,युवराज लखमराजे भोंसले, माजी आमदार राजन तेली, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांसह मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी या गावातील सुप्रसिद्ध असलेल्या हुडा उत्सवास उपस्थित राहून श्री भावई देवीचे दर्शन घेतले. यावेळी कुणकेरी ग्रामस्थ व देवस्थान समिती मार्फत उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी, तालुका सरचिटणीस परिक्षीत मांजरेकर, विनोद सावंत, देवस्थान उपसमितीचे खजिनदार महादेव गावडे, सदस्य कृष्णा मेस्त्री, तुकाराम सावंत, तानाजी सावंत,माजी सरपंच विश्राम सावंत, कुणकेरी तलाठी श्री.धोंड, संदीप सुकी, सेवानिवृत्त तहसीलदार भगवान सावंत, काका मांजरेकर आदी मान्यवर तसेच कुणकेरी ग्रामस्थ उपस्थित होते.