
वैभववाडी : तालुक्यातील काही नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल वैभववाडी पोलीसांनी मुळ मालकांना मिळवून दिले.७० ते ८० हजार रूपये किमंतीचे चार मोबाईल पोलीसांनी काल (ता.११)मुळ मालकांच्या स्वाधीन केले.पोलीसांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
वैभववाडी पोलीस स्थानकात गहाळ झालेल्या मोबाईलच्या चार तक्रारी दाखल होत्या.यामध्ये सिध्देश जितेंद्र राणे रा.दारूम,किशोर कुडतरकर,रा.नाधवडे,शर्वरी सावंत रा.करूळ,प्रकाश ईलवडेकर रा.नाधवडे यांचा समावेश होता.यासंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या मार्गदर्शनाखाली वैभववाडी पोलीस तपास करीत होते.दरम्यान हे मोबाईल काही दिवसांपुर्वीच वापरात आल्याचे पोलीसांच्या निर्दशनास आले.त्यानतंर पोलीसांनी जे लोक हे मोबाईल वापरत होते.त्यांच्याशी संपर्क साधला.त्यांना मोबाईल पोलीस स्थानकात जमा करण्यास सांगीतल्यानतंर चारही मोबाईल पोलीसांकडे देण्यात आले.त्यानतंर काल सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.अवसरमोल यांनी मुळ मोबाईल मालकांच्या स्वाधीन हे मोबाईल केले.पोलीसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
.