करुळ घाटात अपघातस्थळी पोलीस पथक - सह्याद्री जीव रक्षक टीम दाखल

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 19, 2023 11:13 AM
views 1457  views

वैभववाडी : करुळ घाटात पहाटे डंपर दरीत कोसळून अपघात झाला. सुमारे ८०फूट  दरीत डंपर कोसळला आहे.चालक डंपरखाली अडकला आहे. त्याला काढण्यासाठी क्रेन बोलावली आहे.

अपघात स्थळी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पो.हवालदार.नितीन खाडे, पो.नाईक राहुल पवार, रमेश नारनवर, पो. कॉ.अजित पडवळ, हरिश जायभाय पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच मदतकार्यासाठी करुळ येथील सह्याद्री जीव रक्षक टीमही घाटात पोहचली आहे.