
देवगड : देवगड येथील युवतीची छेड काढल्या प्रकरणी वसईतील पोलीस शिपाई गीते, व रानडे या दोघा पोलिसांना पोलीस आयुक्तांनी निलंबितकेले असून ही बाब वसईत समजताच खळबळ उडाली आहे. ज्या पोलिसांचे काम रक्षण करण्याचे आहे. तेच महिलांची छेड करण्याचा प्रयत्न करत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. शुक्रवारी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) सुहास बावचे यांनी विनयभंग करणारे पोलीस शिपाई हरिराम गिते आणि प्रवीण रानडे या दोघांना सेवेतून निलंबित केले आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनिमय १९५१ च्या कलन २५ अन्वये प्राप्त अधिकारानुसार व मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) नियम १९५६ मधील नियम ३ च्या पोटनियम १ च्या खंड (अ-२) (१-अ) (एक) (दोन) अन्वये निलंबित करण्यात आल्याचे या पत्रकात म्हटले आहे.किती आरोपींनी अटक? १) हरिराम गिते (३५) २) प्रवीण रानडे (३४) ३) माधव केंद्रे ४) श्याम गिते (३५) ५) शंकर गिते (३२) ६) सतवा केंद्रे (३२) या ५ जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींपैकी दोन वसई वाहतूक शाखेतील पोलीस आहेत तर एक जण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) आणि एक जण राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) दलात कार्यरत आहे.