पोलीस उपनिरीक्षक जगदीश दूधवडकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन..!

Edited by: विनायक गावस
Published on: March 10, 2024 12:52 PM
views 1038  views

सावंतवाडी : आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश दूधवडकर यांचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराचा झटक्याने दुःखद निधन झाले. ही घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलिस दुरक्षेत्रात घडली. हृदविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. जगदीश दुधवडकर हे गेली पूर्वी सावंतवाडी येथील उपविभागीय कार्यालयात कार्यरत होते.

त्यानंतर त्यांना आंबोली येथील पोलीस ठाण्यात जबाबदारी देण्यात आली होती. रविवारी सकाळी ते पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ते जागीच कोसळले. त्यानंतर त्यांना त्वरीत उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आले. परंतु दुर्दैवाने तत्पुर्वीच त्यांची प्राणजत मालवली होती.