
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस भरती प्रक्रियेची शारीरिक आणि मैदानी चाचणी पूर्ण झाली असून, यातिल निवड झालेल्या उमेदवारांची १ का जागेस १० या प्रमाणे लेखी परीक्षेसाठी निवड यादी जाहीर झाली आहे.या सार्वांची लेखी परीक्षा १८ जुलै रोजी सकाळी १० आणि सायंकाळी ३ वाजता होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती २०२२-२०२३ मधील मैदानी चाचणीमध्ये ५०% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे उमेदवारांमधून १:१० प्रमाणे गुणवत्तेनुसार लेखी परीक्षेसाठी १ हजार २५० उमेदवारांची निवड करण्यात आलेली असून, त्याबाबतची सूचना व यादी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर दिनांक प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची १८ जुलै २०२४ रोजी होणार आहे.
या परीक्षा जिल्हा क्रिडा संकुल बहुउद्देशीय हॉल, सिंधुदुर्गनगरी, ओरोस, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग तसेच शरद कृषि भवन, पोस्ट ऑफीस समोर, सिंधुदुर्गनगरी, ओरोस आणि होमगार्ड कार्यालय, सिडको भवन समोर, सिंधुदुर्गनगरी, ओरोस, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे होणार आहेत.
या लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व संबंधित उमेदवारांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळाला भेट देवून त्यामध्ये लेखी परिक्षेसाठी दिलेल्या सूचनांप्रमाणे त्यांना नेमून दिलेल्या परिक्षा केंद्राच्या ठिकाणी, परिक्षा सूरू होण्यापूर्वी ०२ तास अगोदर, परिक्षा केंद्रावर हजर रहावे असे आवाहन जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेले आहे.