सिंधुदुर्गात 19 जूनपासून पोलीस भरती

जिल्हा पोलिस विभाग सज्य : सौरभ अग्रवाल
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 17, 2024 11:46 AM
views 283  views

सिंधुदुर्गनगरी :  सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागातील ११८ पोलीस शिपाई आणि २४ चालक मिळून एकूण १४२ पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया १९ जून पासून सुरू होत आहे.पावसाचे दिवस असले तरीही भरती साठी येणाऱ्या उमेदवारांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे.असे सांगतानाच ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निःपक्ष पातीपणाने होईल असा विश्वास जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ११८ पोलीस शिपाई (५ बॅण्डस्मन पदासह) व २४ चालक पोलीस  शपाई रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज मागविण्यासाठी  policerccruitment२०२४.mahait.org या संकतस्थळावर महाराष्ट्र पोलीसं  भरती प्रक्रीया सुरु करण्यात आलेली होती. त्याप्रमाणे पोलीस शिपाई पदासाटी ५९२० बॅण्डस्मन पदासाटी ७८२व चालक पोलीस  शपाई पदासाठी १३३९ असे एकूण ८० ४२ अमेदवारांचे आवेदन अर्जं प्रापत झालेले आहेत. आवेदन अर्ज वैध टरलेल्या उमेदवारांची  मैदानी चाचणी दि.१९. ०६. २०२४ ते ०१.०७.२०२४ या कालावधीत पोलीस मुख्यालय येथील परेड मैदानावर घेण्यात येणार आहे  याकरोता उमेदवारांना दि:.१९. ०६. २०२४ ते ०१. ०७. २०२४ या कालावधीत टप्याटप्याने महाआयटी विभागाकडून प्रवेशपत्र  उमेदवारांच्या ई-मेल/एसएमएस या माध्यमाद्वारे निंगमित केलेले आहेत, सद्या पाऊसाचा हंगाम सुरु झाल्याने ज्यादिवशी पाऊस  जासत असेल त्यादिवशी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व उंची, छाती मोजमाप घेवून दि.२. ७. २०२४ रोजी नंतर पावसाचे  वातावरण पाहून मैदानी चाचणीकरीता बोलाविण्यात येणार आहे. मैदानी चाचणीवेळी उमेदवारांना शारीरिक इजा पोहच् नये यासाटी  योग्य खबरदारी घेण्यात आलेली असून त्याकरीता वैद्यकिय पथक उलपब्ध ठेवण्यात आलेले आहेत. ज्या उमेदवारांनी (पोलीस  शिपाई बॅण्डस्मन चालक पोलीस शिपाई।सशस्त्र पोलीस शिपाई।कारागृह शिपाई) या पदाकरीता आवेदन अर्ज भरलेले आहेत अशा  उमेदवारांना या एकाचदिवशी अथवा लागोपाठचे दिवशी दोन पदाकरीता प्रवेश निर्गमित झालेले आहेत. असा उमेदवारा या  घटकातील पोलीस भरतीच्या दिनांकास उपलब्ध राहू शकला नाही तर अशा उमेदवारास पहिल्या ठीकाणी हजर राहील्याबाबतचा  लेखी पुरावा दिल्यानंतर त्या उमेदवारांना या पदाच्या भरतीसाठी दुसरी तारीख देण्यात येणार आहे. या घटकात आवेदन अर्ज भरलेला  उमेदवार भरती प्रक्रीयेपासून वंचीत रहाणार नाही, याची काळजी घेण्यात आलेली आहे  

सदर भरती प्रक्रीया ही तटस्थपणे, नि:पक्षपातीपणे व पारदर्शक पार पाडली जाणार असन भरतीप्रक्रीये दरम्यान  गैरप्रकार व भ्रष्टाचार होणार नाही याकरीता योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. पोलीस भरती प्रक्रीये दरम्यान उमेदवारांना व  त्यांचे नातेवाईकांना भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांकडून ओळखी संधर्भात व अन्य प्रकाराचे आमिष दाखवून आर्थिक देवाण घेवाणीचे  गैखव्यवहार करुन फसवणुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदर्ग  येथे समन्वय अधिकारी म्हणून स्वतंत्र पोलीस अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे गैरव्यवहार निदर्शनास  आल्यास त्याबाबतची माहिती पोलीस नियंतरण कक्ष, सिंधुदुर्ग येथील व्हॉटस्अंप क्र. ८२७५७७६२१३वर व दुरध्वनी क्र., ०२३६२.  २२८२०० वर तात्काळ दयावी असे आवाहन पोलीस अधीकषक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.