कुडाळमध्ये तंबाखू विकणाऱ्या दुकानावर पोलिसांची धाड

५८ हजार ८०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: January 24, 2026 19:17 PM
views 282  views

कुडाळ :  कुडाळ शहरातील बाजारपेठेतील दत्ता उर्फ सुशील पडते यांच्या दुकानावर कुडाळ पोलिसांनी छापा टाकून त्यांच्या दुकानांमधून सुगंधी तंबाखू व पान मसाला असा ५८ हजार ८०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये दत्ता उर्फ सुशील पडते यांना कुडाळ पोलिसांनी उशिरा अटक केली आहे. 


कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस स्वप्निल चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यासह संजय कदम, कृष्णा केसरकर, श्री गुरव, श्री भागवत पोलिसांनी बाजारपेठेतील दत्ता उर्फ सुशील पडते यांच्या दुकानावर छापा टाकला. या छाप्यामध्ये त्यांच्याकडून महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेल्या सुगंधी तंबाखू व पान मसाला सापडून आला हा सुगंधी तंबाखू व पान मसाला सावंतवाडी येथील शेखनामक व्यक्तीकडून घेतलेला असल्याचे उघड झाले आहे. हा ५८ हजार ८०७ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे याप्रकरणी दत्ता उर्फ सुशील पडते यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा मानके कलम ५९ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २७४, २७५, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून उशिरा त्यांना अटक करण्यात आली.