कणकवली फोंडाघाट मध्ये जुगारावर पोलिसांची रेड

मोठ्या हस्ती सहज 9 जणांना घेतले ताब्यात
Edited by: उमेश बुचडे
Published on: September 23, 2023 23:03 PM
views 200  views

कणकवली: कणकवली तालुक्यातील फोंडाघाट गांधी चौक मधील एका हॉटेलमध्ये सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर  कणकवली पोलिसांनी शनिवारी रात्री 9 च्या सुमारास धाड टाकली.  यामध्ये 9 जणांना ताब्यात घेतले आहे. व लाखोंची रक्कम पोलिसांनी जप्त केली केली असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. कणकवली पोलीस निरीक्षक यादव यांच्यासह   पोलीस उत्तम वंजारे व सचिन माने , हवालदार विनोद चव्हाण, हवालदार चंद्रकांत झोरे, पोलिस कॉन्स्टेबल किरण मेथे, सचिन माने यांनी हा छापा मारला.  आहे.सर्व आरोपींना कणकवली पोलीस ठाण्यात आणले असून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये मोठमोठ्या हस्तींची  ची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे