
देवगड : देवगड तालुक्यातील वाडा ब्राह्मणवाडी येथील एका होम स्टेवर 21 सप्टेंबर रोजी पोलिसांनी छापा टाकून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून 1.17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र या गुन्ह्यातील काही संशयित सत्ताधाऱ्यांशी संबंधित असल्याने स्थानिक प्रशासन कारवाईचा दिखाऊपणा करत असल्याचा आरोप उबाठाचे युवासेना तालुकाप्रमुख गणेश गांवकर यांनी केलाय.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटलंय की, देवगड पोलीस ठाण्यात रजिस्टर क्र. 149/2025 अंतर्गत, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार (कलम 12(अ), 4, 5) हा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अपेक्षा नुसार या गुन्ह्यांचा स्थानिक पोलीस प्रशासन तपास करताना दिसत नाही. असा आरोप गणेश गावकर यांनी केलाय.










