
कणकवली: मी पालकमंत्री असताना जिल्ह्यात अवैध धंदे सुरु दिसता कामा नयेत असे पोलीस व अन्य सरकारी यंत्रणांना वेळोवेळी सांगत आलो आहे. अवैध धंद्यांविरोधात कारवाईचे वेळोवेळी आदेश दिले होते. अगदी टीप दे? नही पोलिसांनी कारवाई केली नव्हती. पण, माझे नेटवर्क किती स्ट्रॉग आहे, हे आता पोलिसांना समजले असेल. सूचना दे? नही त्या मटका व्यवसायिकावर कारवाई न करणाऱ्या पोलिसांवर योग्य ती कारवाई होणारच आहे. दोन ते तीन पोलीस निलंबीत होणारच, असा इशारा पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिला. मी नारायण राणेंचा मुलगा आहे. माझी बांधिलकी सिंधुदुर्गच्या जनतेशी आहे, असेही ते म्हणाले. गुरुवारी कणक वलीतील मटका व्यवसायिकावर दस्तुरखुद्द राणे यांनी कारवाई केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते.
कणकवलीतील घेवारी याच्या मटका अड्ड्यावरील कारवाईबाबत मी मुख्यमंत्री फडणवीस तसेच राज्याच्या पोलीच प्रमुखांशी बोललो आहे. दोघांनाही भेटून माझ्याकडील सर्व माहिती देणार आहे. येथील पोलीस भलेही लपवालपवी करतील. पण, माझ्याक डे सर्व पुरावे आहेत. कारण, कालच्या आरोपींचे मोबाईल, अड्ड्यावरील लॅपटॉल याच्यातील सर्व माहिती मी माझ्याकडे घेतली आहे. त्यामुळे माझ्या नादी लागू नका, असा इशाराही राणे यांनी दिला.
यावेळी राणे यांनी विशेषकरून पोलिसांना सातत्याने इशारा दिला. गोवा दारूच्या कनेक्शनविषयी मला पूर्ण माहिती आहे. त्या विक्रेत्यांकडून कुणाकुणाला पाकीटे जातात, याचीही मला कल्पना आहे. मला एकदा आजमावून बघाच. दहा वर्षे विरोधी पक्षात संघर्ष करून मी या पदापर्यंत पोहोचलो आहे. अर्थात हे काम जनतेते केले आहे. साहजिकच मी जनतेचा चौकीदार असून येथील तरुणाई बरबाद करणाऱ्यांना मी सोडणार नाही, असेही राणे म्हणाले