
सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सावंतवाडी शहरात पोलिस संचलन करण्यात आले. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन करण्यात आले. यात दोन पोलीस निरीक्षक सात पोलीस उपनिरीक्षक आणि ४० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.