पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचा सन्मान

मालवणातल्या विविध संघटनांकडून पुढाकार
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 26, 2025 15:20 PM
views 110  views

मालवण : स्वराज्य संघटना, मातृत्व आधार वाईल्ड लाईफ रेस्क्यूलर सिंधुदुर्ग, यशराज प्रेरणा आचरा, कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग यांच्यावतीने मालवण पोलीस ठाण्यातून बदली झालेले पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचा आज हृद्य सत्कार करत भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

मालवण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक या पदावर नियुक्ती झाल्यानंतर प्रवीण कोल्हे यांनी गेल्या काही वर्षात चांगले काम केले. मदत कार्यात ते नेहमी पुढे असायचे. सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमातही त्यांनी उपस्थिती दर्शवित चांगले मार्गदर्शनही केले. अशा या कार्यतत्पर अधिकाऱ्याची ओरोस येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेत बदली झाली आहे. या बदली निमित्त विविध संस्थांच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. 

यावेळी स्वराज्य ढोल ताशा पथकाच्या संस्थापिका शिल्पा यतीन खोत, मातृत्वचे संस्थापक संतोष लुडबे, मंदार सरजोशी, दादा वेंगुर्लेकर, श्रमिका लुडबे, गौरी सातार्डेकर, भारती वायरकर, कल्पिता जोशी, आनंद बांबर्डेकर, स्वप्निल परुळेकर, शांती तोंडवळकर, अमन गोदावले, श्रीकांत मालवणकर, मुन्ना हरचकर, मिथिल, संजय अंजनकर, संदीप नेवाळकर, संदीप भगत, संतोष सकपाळ, जगदीश तोडणकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.