कलमठचे सुपूत्र, पोलीस निरीक्षक पराग उकर्डे यांचा सत्कार

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 20, 2025 11:45 AM
views 309  views

कणकवली : कलमठ गावचे सुपुत्र पराग उकर्डे यांना पोलीस निरीक्षकपदी बढती मिळल्याबद्दल त्यांचा कलमठ ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड, मुख्याध्यापक श्रीकांत बुचडे, ग्रा. पं. सदस्य नितीन पवार, अनुप वारंग, सचिन खोचरे, बाबू नारकर, आबा कोरगावकर, महेश मेस्त्री, कृष्णा कांबळी, संतोष रेवंडकर,  समर्थ कोरगावकर, प्रवीण सावंत, मनोज घाडीगावकर, दिनार लाड, प्रथमेश धुमाळे, पराग यांच्या आई व कुंटुंबीय उपस्थित होते.

मुंबई पोलीस खात्यात कार्यरत असलेले पराग उकर्डे हे पोलीस निरीक्षकपदी बढती होऊन कलमठ गावात आले असता  मित्रपरिवाराने स्वागत करत सत्कार केला. कलमठ सुपुत्र असलेले पराग उकर्डे हे कलमठ - कोष्टीवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण कणकवलीमध्ये झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून मुंबई पोलीस खात्यात त्यांनी यशस्वी काम केले असून पोलीस निरीक्षकपदी बढती मिळल्याने सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.