पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमोद काळसेकर यांची कामगिरी दमदार

पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते विशेष सन्मान
Edited by: विनायक गावस
Published on: June 24, 2023 15:51 PM
views 227  views

सिंधुदुर्ग : गोपनीय माहितीद्वारे सापळा रचून अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेत प्रशंसनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमोद काळसेकर यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

2 किलो 103 ग्रॅम गांजा जप्त करत आरोपीला अटक केल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते प्रमोद काळसेकर यांना प्रशंसापत्र प्रदान करण्यात आल. यावेळी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले उपस्थित होते. याआधी देखील प्रशंसनीय कामगिरी बजावल्याबद्दल पोलिस काळसेकर यांचा गौरव करण्यात आला होता. त्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून त्यांच अभिनंदन केले जात आहे.