कार अपघातात पोलीस हवालदार यशवंत तांबे यांचं निधन

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 22, 2024 06:08 AM
views 4412  views

कणकवली : मुंबई - गोवा महामार्गावर  नांदगाव - पियाळी पुलावर शनिवारी ( आज ) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कारचा अपघात होऊन महामार्ग केंद्र, कसाल येथे नेमणुकीस असलेले वाहतूक पोलीस हवालदार  यशवंत उर्फ (अभिजित) भास्कर तांबे वय 45 राहणार वैभववाडी हे कसाल येथून आपल्या वैभववाडी गावी जात असताना पियाळी पुलावर आल्यावर ड्रायव्हरचा कार वरील ताबा सुटल्याने कार क्रमांक ( एमएच १२ केएस १२९९ ) महामार्गावरील डिव्हायडरला आदळली. यामध्ये कारचा समोरील भागाचा चक्काचूर झाला होता. यात तांबे यांचा  मृत्यू झाला.

 तसेच सोबत असणारे रूपेश विकास साळवी वय -33 रा. वैभववाडी व प्रवाशी  प्रतीक सोनू बेळेकर वय - 28 रा. वैभववाडी यांना गंभीर दुखापत झाले असल्याने त्याना  उप जिल्हा रुगणालय कणकवली या ठिकाणी अधिक उपचाराकरा करिता पाठविण्यात आले. असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती समजतात कणकवली पोलीस आणि वाहतूक पोलीस यांनी धाव घेत मदत कार्य केले.