
सिंधुदुर्गनगरी : चालक पदांकरीता एकुण 2 हजार 126 उमेदवारांनी अर्ज केले होते. आज 700 उमेदवारांना मैदानी चाचणी करिता बोलाविण्यात आले होते. त्यापैकी 467 उमेदवारांनी मैदानी चाचणीला उपस्थिती लावलेली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली.
4 जानेवारी 2023 पर्यंत 22 रिक्त पोलीस चालक पदाकरिता पोलीस मुख्यालय मैदान, सिंधुदुर्गनगरी येथे चाचणीला सुरुवात झाली आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदाकरिता दि. 05 जानेवारी पासून भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.