
कणकवली : कणकवली शहरात आईसोबत खरेदीसाठी आलेला तीन वर्षांचा मुलगा हरवला होता. हा प्रकार वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांना कळल्यानंतर त्यांनी मुलाच्या आई-वडिलांचा शोध घेतला. त्यांना कणकवली पोलीस ठाण्यात. बोलावून घेत मुलगा त्यांच्या ताब्यात दिला. विनोद चव्हाण यांच्या या सतर्कतेबद्दल त्यांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.
एक महिला आपल्या मुलासह कणकवली बाजारामध्ये खरेदीसाठी आली होती. खरेदी करून झाल्यानंतर ती तेथून निघून गेली. दुर्दैवाने तिचा छोटा मुलगा तिथेच राहिला होता. ही बाब संतोष नामक भाजी विक्रेत्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांना कळवले. विनोद चव्हाण यांनी हरवल्या मुलाच्या आई-वडिलांचा शोध घेतला. त्यानंतर दोघांनाही बोलवून घेतले व मुलाला त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. चव्हाण व भाजी विक्रेत्याने दाखवलेल्या सजगतेबद्दल त्यांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.