
दोडामार्ग : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दोडामार्ग केंद्रशाळा नं १ च्या इयत्ता तिसरीतील स्पृहा सुमित दळवी हिने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावत विजयाची हॅट्रिक केली आहे. जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी या गटात जिल्ह्यातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. या गटाला "सुसंस्कार यशाचे रहस्य" हा विषय होता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारे हा विषय यशस्वीपणे मांडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्रथम क्रमांक स्पृहा सुमित दळवी दोडामार्ग केंद्रशाळा नं.१, द्वितीय क्रमांक श्रेयस रेडकर सावंतवाडी, तृतीय क्रमांक प्रांजल नार्वेकर उभादांडा शाळा नं.३, तर उत्तेजनार्थ क्रमांक चिनमई बागवे सावंतवाडी, ज्ञानेश्वरी तांडेल तुळस यांना विभागून देण्यात आला. संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण प्रा.वैभव खानोलकर व प्रा.प्रगती चव्हाण यांनी केले.या स्पर्धेचे पारितोषिक वितरण ११ जानेवारी रोजी अश्वमेध या महोत्सवात होणार आहे.
स्पृहा दळवी हिला केंद्रशाळा दोडामार्ग नं.१ या शाळेतील शिक्षकांचे तसेच पालकांचे मार्गदर्शन मिळाले. सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक मिळवून हॅट्रिक करणाऱ्या स्पृहा दळवी हिच्या यशाचे सर्व स्तरावरून गोडकौतुक होत आहे.











