कवयित्री योगिता शेटकर यांच्या काव्यसंग्रहाचे १७ सप्टेंबरला सावंतवाडीत प्रकाशन..!

काव्यरसिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
Edited by: विनायक गावस
Published on: September 14, 2023 20:05 PM
views 133  views

सावंतावडी : कवयित्री योगिता शेटकर यांच्या मुंबई येथील ग्लोबल बुक हाऊस प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ' 'करुणेचा प्रवाह ' कव्यांग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार १७ सप्टेंबर रोजी स.१०.३० वा.सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिरच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ऍड. देवदत्त परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात नामवंत कवी अजय कांडर यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ललित लेखक प्रा.वैभव साटम आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज लिहिल्या जाणाऱ्या नव्या पिढीतील योगिता शेटकर या आश्वासक कवयित्री आहेत विविध दिवाळी अंकात त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या असून अनेक कविसंमेलनांमध्ये त्यांनी आपले कविता वाचन केले आहे. आता त्यांचा मुंबई ग्लोबल बुक हाऊसतर्फे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला असून त्याचा सदर प्रकाशन समारंभ कोकणातील दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

करुणेचा प्रवाह या काव्यसंग्रहाला पुणे येथील डेप्युटी कमिशनर तथा प्रसिध्दी कवयित्री अंजली ढमाळ यांची प्रस्तावना लाभली आहे.त्यात त्या म्हणतात योगिता यांच्या सदर संग्रहातील अनेक कवितांमधून सध्या दिसणाऱ्या माणसाच्या वस्तूकरणाबद्दल, मानवी जीवनावरील बाजाराच्या परिणामाबद्दल, विद्वेषाचे विष पसरवणाऱ्या विचारांबद्दल परखड भाष्य दिसून येते. आणि हे सर्व जाणून असलेली समंजस कविता मांडतानाच कवयित्री आपल्या कवितेत कुठेही निराशा व कडवटपणा येऊ देत नाही. तर कवी अजय कांडर यांची सदर सग्रहाच्या मलपृष्टावर पाठराखण लाभली असून त्यात ते म्हणतात,

सदर संग्रहातील कवितेत बदलत्या काळाच्या शतखंडित जगण्याची तीव्रता मांडताना ही कवयित्री "आयुष्य रंगीन होत जाताना कोणता रंग कधी उडून जाईल हे सांगता येत नाही" अशा भयसूचकतेकडेही निर्देश करते.जगण्याच्या मर्यादेची जाणीव करून देतानाच 'करुणेचा प्रवाह' मधील कविता जगण्याचं समग्र भान व्यक्त करण्यात यशस्वी झाली आहे. कोकणात आज लिहिल्या जाणाऱ्या कवितेत या कवयित्रीची वाट स्वतंत्र आहे. तरी या कार्यक्रमात साहित्य रसिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.